• (0233) 2313999
  • shantiniketansangli@gmail.com
  • सांगली, महाराष्ट्र

आचार्य जावडेकर गुरूकूल, इस्लामपूर

आजचं इस्लामपुर एज्युकेशनल हब म्हणून नावारुपाला येत असलेलं दिसत असलं तरी ४९ वर्षापूर्वी या आधुनिक शिक्षणाची पायाभारणी प्राचार्य  डॉ. पी.बी.पाटील आणि सहकाऱ्यानी केली होती. शून्य ते चौदा वयापर्यंतचं शिक्षण सार्वत्रिक मोफत व सक्तीचं मिळाल्याशिवाय आजच्या दिशाहीन शिक्षण व्यवस्थेचा समतोल साधणं शक्य नाही हे प्राचार्य  पी.बी.पाटील त्यावेळीही सांगत होते. हे धोरण डोळ्यांसमोर ठेऊनच संस्थेची आचार्य जावडेकर गुरूकूल, इस्लामपूर ही शाखा १९७० मध्ये सुरू झाली आहे आणि आजही याच धोरणानं ही शाखा आपला नावलौकिक टिकवून आहे. त्याकाळात शाळा सुरु करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नव्हती. अनेक अडचणी होत्या. जागा-निधीची अडचण होती, पण त्यातून आत्मविश्वासानं मार्ग निघत गेले. आचार्य शं.द. जावडेकर यानी विद्यार्थी वसतिगृहासाठी देणगी स्वरूपात याअगोदर जागा दिलीच होती, या शाखेसाठी संस्थेनं मग या जागे लगतची जागा खरेदी केली. विद्यार्थी वसतिगृहामुळं या जागेला शैक्षणिक वातावरण लाभलं होतचं. त्याचाही फायदा ही शाखा सुरु करताना झाला. सद्यस्थितीला या शैक्षणिक परिसरात संस्थेच्या मालकीची सुमारे सात एकर जागा आहे. या शाखेत इ.५ वी ते इ.१० वी अशी माध्यमिक शिक्षणाची सोय असून शाखेचा क्रीडा व सांस्कृतिक विभाग देखील अत्यंत यशस्वीपणे कार्यरत आहे. अनेक अडचणी असताना फक्त जिद्दीनं शिकायचं या ध्येयानं आलेली मुलं या शाळेत शिकत आहेत. या शाखेचा नावलौकिक वाढवण्यात माजी विद्यार्थ्यांचाही मोलाचा सहभाग आहे. या शाळेसाठी त्यांच्याही मनात प्रेम आणि आदर अजूनही टिकून आहे. संस्थेचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गही ही जाणीव ठेऊन कार्यरत आहे. शाखा प्रगतीपथावर वाटचाल करते आहे.