• (0233) 2313999
  • shantiniketansangli@gmail.com
  • सांगली, महाराष्ट्र

संस्थेबद्दल

चांगल्याला चांगलं म्हणायची दानत आणि वाईटाला वाईट म्हणायची हिंमत जन-गण-मनात निर्माण झाल्याशिवाय अधिनायकाचा विजय होणार नाही, असं प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील म्हणायचे. हे नुसतं म्हणून ते थांबले नाहीत तर असा अधिनायक घडवण्याचा निश्चय त्यांनी केला आणि त्यातून उभे राहिले नवभारत शिक्षण मंडळ . १९५२ मध्ये अनौपचारिक रणशिंग फुंकल्या नवभारत शिक्षण मंडळाच्या कामाला १९५८ मध्ये घटनात्मक स्वरूप आलं. १० फेब्रुवारी १९५८ रोजी त्याला कायदेशीर मान्यता मिळाली . आचार्य जावडेकर, आचार्य भागवत, यशवंतरावजी चव्हाण, डॉ.जे.पी.नाईक, ले. ज. एस.पी.पी. थोरात, पद्मभूषण वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, बाळासाहेब खर्डेकर, बाबूरावजी जगताप, भाऊसाहेब खराडे, दीनानाथ भोसले, आण्णासाहेब कराळे, बाजीराव बाळाजी पाटील, विठ्ठलराव देशमुख, एम.आर.देसाई, नागनाथअण्णा नायकवडी, टी.के.पाटील (इंजिनिअर) यांच्यासारखी आभाळाएवढी ,माणसे या संस्थेच्या उभारणीत नवा विचार घेऊन उभी होती. त्यांचं लाख मोलाचं मार्गदर्शन, सहकार्य संस्था उभारणीसाठी मिळालं. या मोठ्या माणसांनी संस्था उभारणीत सक्रिय सहभाग घेतला. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय शासनाचा अस्त नाही तर प्रयत्नाला मोकळीक, सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करण्याची संधी म्हणजे स्वातंत्र्य याच भान ठेवत मानवतावादी मन, संशोधक बुध्दी आणि सत्याग्रही वृत्ती असणारा कणखर शरीराचा नागरिक म्हणजे स्वतंत्र भारताचा नागरिक शिक्षणातून घडवण्यासाठी जाणिवपुर्वक ‘नवभारत’ चा जन्म झाला आहे.

महाराष्ट्रात शिक्षण संस्था कमी आहेत म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आलेली नाही तर चाकोरीबाह्य पण योग्य शिक्षण अमलात आणून नवभारताच्या उभारणीत एक ‘चांगला नागरिक’ या संस्थेतून निर्माण व्हावा हा उद्देश यामागे होता. त्यासाठीच सत्य-श्रम-प्रेम या बोधवाक्यानं या संस्थेची उभारणी करण्यात आली. अ‍ॅड.एस.बी.पाटील, हिंदकेसरी कै. मारुती माने, रावसाहेब पाटील, रमणभाई शहा, शिवाजीराव पवार, सनतकुमार आरवाडे, तानाजीराव कोरे, आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील, डॉ.एस.आर.पाटील, आर.आर.पाटील (आबा), या साऱ्या मान्यवरांच्या मार्गदर्शनानं आज इतक्या वर्षांनी शांतिनिकेतनचं रूप आणि स्वरूप, चारी अंगांनी प्रचंड बदललं आहे. संस्था ग्लोबल झाली आहे, पण तरीही बहुजन कष्टकरी जनतेशी असलेली नाळ मात्र कायमची जोडली गेली आहे. प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील यांच्या कल्पनेतील ‘नवभारत’ घडविण्याचं काम सरोजताई पाटील (माई) यांनी केलं. त्यांच्यानंतर आता ही संस्था सर्वार्थानं समर्थ आणि संस्कारक्षम केली ती संचालक गौतम पाटील यांनी दर्जेदार शिक्षणासोबत दर्जेदार कला आणि क्रीडा यांचं प्रशिक्षण देणारी ही एकमेव संस्था असावी. कल्पनेच्या पलिकडील अनेक उपक्रम श्री. गौतम पाटील यांच्या संकल्पनेतून या संस्थेत साकार होत आहे. शिक्षण संस्था कशी असावी? हे पहायचं असेल तर शांतिनिकेतनला भेट द्यावी असं देशभरातील जाणकार म्हणतात ते यासाठीच