• (0233) 2313999
  • shantiniketansangli@gmail.com
  • सांगली, महाराष्ट्र

ऑगस्ट क्रांती स्मृतिस्तंभ

ऑगस्ट क्रांती स्मृतिस्तंभ    

ऑगस्ट क्रांती स्मृतिस्तंभ

किती जगलो यापेक्षा कसे जगलो हे फार महत्वाचं असतं आणि त्यावरच माणसाचं मोठेपण ठरतं. देशाच्या  स्वातंत्र्ङ्मासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची महानता यासाठीच मोठी आहे आणि  ही महानता जपण्याची नैतिक जबाबदारी शांतिनिकेतन लोकविद्यापीठानं पार पाडली आहे. ३५ एकर जागेवर वसलेल्या  हिरव्यागार शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात कोणत्यातही जाती-धर्माचं मंदिर नाही. आहे तो क्रांतिस्मृती स्तंभ. ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींजींनी ब्रिटिशांना चले जाव असा आदेश दिला आणि अवघा देश रस्त्यावर उतरला. सांगली-सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून जवळपास ५ हजार १६० स्वातंत्र्यसैनिकांनी या लढ्यात भाग घेतला. ९३ स्वातंत्र्यसैनिकांनी हौतात्म्य पत्करले. ही देशभक्तीची भावना नव्या पिढीत जोपासली जावी यासाठी हयात असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्य संग्राम संस्था स्थापन केली व नवभारत शिक्षण मंडळ सलग्नीत सर्व शाखांनी या स्तंभाची उभारणी केली.

उभारणी :

दि.३० जानेवारी १९९४

प्रमुख उपस्थिती :

अटलबिहारी वाजपेयी, मधु दंडवते, विलासरावजी देशमुख, नागनाथअण्णा नायकवडी, नरेंद्रजी तिडके, शिरूभाऊ लिमये, रत्नाप्पाआण्णा कुंभार, प्रतापराव भोसले, विलासकाका उंडाळकर आणि ५ हजार स्वातंत्र्यसैनिक.