• (0233) 2313999
  • shantiniketansangli@gmail.com
  • सांगली, महाराष्ट्र

संस्थापक

प्राचार्य डॉ.पी.बी. पाटील म्हणजे देशातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व.  भारतीय समाजातील एकूण एक क्षेत्रात साहेबांनी आपल्या कार्याची मोहोर उमटवलेली आहे. समाजमनाच्या सर्वांग उन्नतीसाठी आपली सारी हयात त्यांनी निरपेक्षपणे व्यतीत केली. व्यक्तीच्या उन्नतीमध्ये राष्ट्राची प्रगती दडलेली असते, हा त्यांचा साधा सोपा विचार वेळो वेळी अधोरेखित झाला आहे. त्यांच्या  पश्चात  आजही त्यांचे बहुमोल विचार समाजाला मार्गदर्शन करीत आहेत. समाजभान बाळगून समाज वैभवाच्या  विचारांचं ऐश्वर्य  शेवटच्या  श्वासापर्यंत जोपासणारे साहेबांचे व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्राचा अभिमान आहे.

प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील

शेतकरी आणि साहित्यिक हे समाजाचे दोन मुख्य घटक असतात. समाज रथाची ही दोन चाकेच. एक जगवतो तर दुसरा कसं आणि का जगायचं हे शिकवतो. साहेबांच्या  ठायी  या दोन्ही घटकाचा आदर्श मिलाप आहे. साहेबांचा जन्म शेतकरी कुटुंबातला. त्यामुळे ते जन्मजात शेतकरी होतेच पण आपल्या  दूरदृष्टी कुशल लेखन व वक्तृत्व कौशल्या ने साहित्यिक म्हणून साहेबांनी मिळवलेला लौकिक आजही टिकून आहे. मकर संक्रांती दिवशी म्हणजे १४ जानेवारी १९३२ रोजी. सांगली जिल्ह्यातल्या  वाळवे तालु्नयातील चिकुर्डे या छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. चिकुर्डे या गावातच त्यांनी औपचारिक शिक्षणाचा श्रीगणेशा केला. पारतंत्र्ङ्माचा तो काळ होता. सर्वत्र ब्रिटीश सरकार विरोधी असहकार आंदोलनाने जोर धरलेला होता. वाळवा तालु्नयात स्वातंत्र्ङ्माचं वादळच घोंगावत होतं. प्रभात ङ्केèया आणि राष्ट्र सेवादलाच्या  प्रत्येक कार्यक्रमास साहेबांचा लहान वयातही सहभाग असायचा. कै. पांडु मास्तर, शहीद शंकरराव निकम, श्री. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या  सारख्ङ्मा क्रांतिकारकांना उत्साहाने मदत करायचे.कधी त्यांना जेवणाचे डबे पोहचवायचे तर कधी बातम्या  पोहचवायचे.

पुढे माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी तालु्क्याची आणि जिल्ह्याची वाट धरली. या वयात कै. आचार्य  जावडेकर यांच्या  लाभलेल्या  सहवासातून साहेबांनी लोकशाही समाजवादाचे आणि राष्ट्रीय सामाजिक चळवळीचे प्राथमिक धडे घेवून आपला सामाजिक विचारांचा पाया भक्कम केला. उच्च शिक्षणासाठी पुढे कोल्हापूर गाठले. बॅरीस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या  निवासी महाविद्यालयात त्यांचे शिष्यत्व पत्करले तिथून राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविदयालयी न काळात यांच्या  विचारांचा पाया विस्तारला. आंतर महाविद्यालयीन वादविवादाच्या  प्रत्येक स्पर्धेत साहेबांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस ठरलेलंच असायचं. उभ्या महाराष्ट्रातील एकही स्पर्धा त्यांनी सोडली नाही तसेच बेळगावच्या  वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या  ‘गोगटे ढाल’ चे ते सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकाचे मानकरी होते. आपल्या  मुद्देसूद वक्तृत्वाने या स्पर्धा जिंकून मिळवलेल्या  पैशातून त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी इस्लामपूर येथे एक आश्रमशाळा स्थापन केली. आजही ही आश्रमशाळा आचार्य  जावडेकर गुरुकुल या नावाने उत्तम रितीने सुरु आहे. हे साल होते १९५२.

१९५५/५६ मध्ये आचार्य  विनोबा भावेंच्या  भूदान चळवळीने जोर धरला होता. या चळवळीतही साहेबांनी आपली महत्वाची भूमिका निभावली. या भूदान चळवळीत सक्रिय होण्यासाठी त्यांनी महाविद्यालयी न शिक्षणाला एक वर्ष रामराम ठोकला. पुणे, ठाणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या  दुर्गम भागातील खडतर मार्गावर पायी  चालत जावून भूदान चळवळीचे महत्व लोकांना पटवून या चळवळीला ङ्कार मोठी मदत केली.

१९५७ मध्ये साहेबांनी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तिथूनच राज्यशास्त्र व अर्थशास्त्र हे दोन विषय घेवून एम.ए.झाले. पुढे मौनी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. इथेच प्रसिध्द शिक्षण तज्ञ कै. जे.पी.नाईक यांच्या  मार्गदर्शनाखाली काम करण्याची त्यांना संधी मिळाली. शिक्षण क्षेत्रात पायाभूत भरीव कार्य करावे ही साहेबांची ङ्कार वर्षापासूनची इच्छा. १९५८ साली ती पूर्णत्वास गेली. मनवभारत शिक्षण मंडळङ्क या नावाने साहेबांनी नव्या भारतासाठी आदर्श शिक्षणाची कवाडे खुली केली. आज नवभारत शिक्षण संस्था या मातृसंस्थेच्या  पंखाखाली अनेक शाखा व संस्था उत्तम रितीने शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्याचा वारसा जपत जोमाने वाटचाल करीत आहेत.

ग्रामीण भारत हा साहेबांचा चिंतनाचा विषय. ग्रामीण लोकजीवन आणि कृषी संस्कृती हा साहेबांचा ध्यासाचा विषय होता. याच ध्यासाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले. १९५९ मध्ये सिलोन येथे युनोस्को तर्फे चालवलेल्या  ‘हायर रुरल ऑर्गनायझेशनच्या’ आंतरराष्ट्रीय संस्थेत त्यांनी काही काळ प्राध्यापक  म्हणून आपले विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडले.  त्यानंतर  ‘मास एज्ङ्मुकेशन’ या विषयाच्या  अभ्यासासाठी इंग्लंडला दोन वर्षासाठी रवाना झाले. हाच धागा पुढे ‘पंचायत राज्य या विषयापर्यंत येवून पोहचतो. १९६२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या  वतीने सांगलीच्या  पंचायत राज्य प्रशिक्षण केंद्रावर संचालक आणि प्राचार्य पदावर सन्मानाने निङ्मुक्ती करण्यात आली. १९६९ पासून शांतिनिकेतन महाविद्यालयाच्या  प्राचार्य पदाची धूरा त्यांनी अखेरपर्यंत व्रतस्थपणे सांभाळली.

प्रा.डॉ.पी.बी.पाटील साहेब हे उत्तम राजकीय विश्लेषक आणि सखोल जाणकार अभ्यासक होते. त्यांच्या  अनेक लिखानातून त्यांच्या  राजकीय परिपक्वतेची प्रचिती येते असे अष्टावधानी अभ्यासू व्यक्तिमत्व प्रत्यक्ष राजकारणात ही यायला पाहिजे म्हणून तत्कालीन राजकीय धुरीणांनी प्रयत्न करुन साहेबांना सक्रिय राजकारणात आणले आणि १९७२ ते १९७८ या पाच वर्षात त्यांनी आमदार म्हणून आपला वेगळाच राजकीय आदर्श आणि पारदर्शी राजकीय व्यक्तिमत्वाची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करुन दिली. पुढे त्यांच्या कडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीने जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली. इथेही त्यांनी आपल्या  अभ्यासू वृत्तीचा धडा घालून दिला. राज्यातील या राजकीय कार्याने राष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या  कार्याचा दखल घेतली गेली आणि त्यांना अखिल भारतीय काँग्रेसच्या  सदस्यपदी घेवून सन्मानित करण्यात आले.

राजकीय क्षेत्राला समाजाभिमुख करण्याचे महत्वाचे काम साहेबांनी केले. मानसन्मानासाठी राजकारण नसून लोकांच्या  कल्याणासाठी राजकारण आहे. राजकारणातील सत्ता, पदे ही सत्तेची पदे नसून विश्वासाने पार पाडण्याची जबाबदारीची पदे आहेत. हा विचार त्यांनी आपल्या  राजकीय क्षेत्रातील कार्याने अधोरेखित केला. म्हणून तर त्यांना अनेक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणारे पंचायत राज्य मूल्यमापन समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्षपद, महाराष्ट्र राज्यनियोजन मंडळाचे सदस्य, प्रादेशिक जिल्हा नियोजन मंडळ सांगलीचे चेअरमन अशा अत्यंत महत्वाच्या  पदांच्या  जबाबदाऱ्या  साहेबांनी आपल्या  कर्तृत्वाचा नवा ठसा उमटवून खूप चांगल्या  पध्दतीने  पेलल्या .

या राजकीय पदांच्या  जबाबदाèया हाताळत असताना. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी भरारी घेतली होती. अनेक संस्थांत संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी चोख कामगिरी बजावून या सर्व संस्था नावारुपाला आणल्या . यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान या संस्थेची स्थापना करुन त्यांचे विश्वस्तपद व जनरल सेक्रेटरी पदावर ही काम केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक सदस्य, इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ एज्युकेशन पुणे आणि लोकसेवा विश्वस्त निधी सांगली या संस्थाचे संस्थापक आणि विश्वस्त सदस्य तसेच सांगलीच्या  वसंतदादा विकास प्रतिष्ठानचे संस्थापक व विश्वस्त सदस्य, लोकरंगभूमी, विद्यार्थी विकास विश्वास निधी, यशवंतराव चव्हाण स्मारक समिती आणि बॅरीस्टर जी.डी.पाटील जिमखाना सांगली अशा सांस्कृतिक सामाजिक व क्रीडा क्षेत्रात काम करणाèया संस्थांची स्थापना करुन या संस्थाचे अध्यक्षपद ही भुषवले. तसेच स्वातंत्र्ङ्म संग्राम स्मृती संस्था संस्थापक अध्यक्ष, नवेगाव आंदोलनाचे प्रवर्तक व महाराष्ट्र राज्य सुवर्ण महोत्सव सिंहावलोकन परिषदेचे मुख्य प्रवर्तक म्हणून ही त्यांनी स्वकार्याची भव्य मुद्रा उमटवलेली आहे.

साहेबांची या प्रत्येक क्षेत्रातली उत्तुंग भरारी पाहून शासकीय आणि अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थानी त्याच्या  कार्याची दखल घेत त्यांना अनेक  पुरस्कारांनी सन्मानित केली त्यातील महत्वाचे पुरस्कार असे.

पंचायत राज्य व्यवस्थापनाबाबत इंडियन मर्चंट चेंबरच्या वतीने   “प्लॅटिनम ज्युबिली इन्डॉव्हमेंट ट्रस्ट अवॉर्ड २०००”

पंचायत राज्य ग्रामीण विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल श्री शिवाजी लोकविद्यापीठ, अमरावतीची सन्माननीय “डी लिट” २००२

“स्वातंत्र्ङ्मवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार २००४”

इस्लामपूर जि.सांगली यांचा “मराठाभूषण” पुरस्कार

इचलकरंजी जि.कोल्हापूर यांचा “ङ्काय फाऊंडेशन” पुरस्कार

कोल्हापूरचा “श्री शाहू पुरस्कार” २०१२

सांगलीचा “सांगली भूषण पुरस्कार” २०१३

प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील साहेबांच्या अलौकिक विचारातून व सिध्दहस्तातून निर्माण झालेली लेखन संपदा-

महाराष्ट्राची जडण-घडण आणि यशवंतराव,

जन-गन-मन(मुक्तचिंतन)

जन-गन-मन (समाजकारण)

जन-गन-मन(राजकारण)

नवभारत परिवर्तनाची दिशा – कार्ले शिबीर-परिसंवाद

शिवशाही ते पेशवाई

नवेगांव आंदोलन

क्रांतीसागर

प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील भाषण संग्रह

प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील यांच्या कविता, “कालप्रदक्षिणा”.

साहेबांनी ज्या ज्या विविध क्षेत्रात कार्य केलं त्या क्षेत्रांच सोनं केलं. आजही शांतिनिकेतनच्या  रम्य परिसरात साहेबांनी उभारलेला उंच मऑगस्ट क्रांती स्मृती स्तंभ त्यांच्या  उदात्त भव्यतेची स्मृती चाळवतो तर साहेब आणि माईंच्या नावे उभारण्यात आलेले गुरुकुल त्यांच्या आदर्शाची शिकवण देत आहे. गुरुबनमधील त्यांचा व्यासपीठावरील आश्वासक आणि सजीव भासणारा पुतळा आजही आपल्या  अमोघ वाणीने तिथे येणाऱ्या प्रत्येकाला विचारांचा नवा आयाम देत मार्गदर्शन करीत आहे.


जेष्ठ विचारंवत प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांच्यासारख्या हाडाचा कार्यकर्ता असलेल्या मुलखावेगळ्या माणसाचा संसार सांभाळणं ही साधी सोपी सरळ गोष्ट नव्हतीच मुळात, पण माईंनी हा संसार नुसता सांभाळलाच नाही तर आपल्या संसारासोबत संस्थेचा संसारही समर्थपणानं पेलला. हजारो गोरगरीब मुलांच्या त्या माई झाल्या. माई गेल्या तरी त्यांची माया आजही त्या मुलांच्या मनात ताजीतवानी आहे.

प्राचार्या सौ. सरोजताई पाटील (माई)

माईंचा जन्म  ६ मे १९४७ साली बेळगांवात एका संस्कार संपन्न घरात झाला. वडील बंडोपंत आत्माराम पवार त्यावेळी बेळगांव नगरपालिकेचे चिफ ऑफिसर होते. १० वी पर्यंतचे शिक्षण वनिता विद्यालय  या  मिशनरी स्कूल मध्ये बेळगांव च्या इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेत झाले. येथूनच त्यांच्या  संस्कारक्षम जीवनास सुरूवात झाली. पुढे त्यांनी लिंगराज कॉलेज, बेळगांव येथे ग्रॅज्युएशन केले. २२ जून १९६२ ला समाज परिवर्तनाची आंच असलेल्या , ज्याच्या वर समाजवादाचा पगडा असणाऱ्या कर्तृत्व संपन्न अशा चिकुर्डे(ता.वाळवा) येथील प्रगत शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या  व परदेशात जावून उच्चशिक्षण घेतलेल्या  श्री.पांडुरंग बापूराव पाटील यांच्या शी त्यांचा विवाह झाला. प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील साहेबांनी समाज जीवनास पूरक असा संस्थात्मक आराखडा मांडावा व त्याची पूर्तता सौ.मार्इंनी करावी, हे सूत्रच बनले. त्यासाठी अविश्रांत श्रम, बुध्दिचा वापर करून य शस्वी करणे यात त्यांचा हातखंडा होता.

प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील साहेबांच्या  बरोबरीने सौ.माईंनाही आचार्य जावडेकर, कै.जे.पी.नाईक, ले.ज.एस.पी.पी.थोरात यांच्या सारख्या विद्वान व्यक्तींचे अगदी जवळून सानिध्य लाभले. सौ.माईंनी संस्थेतील मंडळींच आपली कुटूंबिय  मानली. त्यांच्या  प्रत्येक सुखदु:खात त्या सहभागी होत. ही गोष्ट सर्वांना दिलासा देणारी होती. त्यांनी सर्वांना प्रेम दिले आणि त्यांचेही प्रेम मिळविलेही. संस्थारूपी कुटुंबाच्या  त्या आधारवड झाल्या .  

दोन मुली, दोन मुले व दोन कर्तव्यदक्ष सुना यांच्या  जडणघडणीत त्यांनी कुठेही कमतरता ठेवली नाही. त्याचे फलित म्हणजे या  सर्वांनी आपआपल्या  परीने नवभारत शिक्षण मंडळ या  संस्थेला सर्वस्वी वाहून घेतले आहे. संस्थेच्या  जडणघडणीमध्ये माईंचा वाटा फार मोठा आहे. नवीन शाखा चालू करण्याचा असो किंवा त्या प्रस्थापित करून मार्गी लावल्या शिवाय  त्या कधीही स्वस्थ बसल्या  नाहीत. मग ते बालविकास इंग्रजी माध्यम असो, कन्नड शाळा,  मुक्त विद्यापीठ, मराठी माध्यम असो अगर अकॅडमीची सुरूवात असो किंवा कॅम्पस् बाहेरील शाखांचा विस्तार असो, या  सर्वांमध्ये त्या जातीनं सक्रिय  असतं. तसेच इतर शाखांच्या प्रमुखांना प्रोत्साहित करत.

माईंना लोकनृत्याची फार मोठी आवड होती. त्यांनी या तूनच दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम तयार केले. ग्रामीण भागातील लोकांना हा कार्यक्रम म्हणजे एक मोठी पर्वणीच असायची.  माई स्वत: या  कार्यक्रमाबरोबर असायच्या  व जातीने सर्व बाबींवरती कटाक्षानं लक्ष ठेवायच्या . सदा हसतममुख, प्रेमळ, मायाळू व कर्तव्यदक्ष असलेल्या माई प्रसंगी कठोरही व्हायच्या , शिस्तचे धडे द्यायच्या , पण त्यामाग आपुलकीही असायची बरं. आज माई नाहीत पण त्यांची ही शिस्त आणि माया  इथल्या  निसर्गात आणि माणसात भरली आहे.