• (0233) 2313999
  • shantiniketansangli@gmail.com
  • सांगली, महाराष्ट्र

कोटलिंग परिसर विकास प्रकल्प व शेती विकास केंद्र, चिकुर्डे

माणसाला भविष्यकाळ घडवायचा असेल तर त्यानं भुतकाळ न विसरता वर्तमानकाळात वाटचाल केली पाहिजे असं सांगणाऱ्या प्राचार्य  डॉ. पी.बी.पाटील याना इतिहासाविषयि प्रचंड ओढ होती.

त्यांचा इतिहासाचा अभ्यासही अचंबित करणारा होता. त्यातूनच त्यांची रोखठोक मतं तयार झाली होती आणि ती मांडायला त्यांनी कुणाची भिडभाडही ठेवली नव्हती. सांगली जिल्ह्यातील वाळवे व शिराळा तालु्क्याच्या हद्दीवर कोटलिंग नावाचा डोंगर असून त्या डोंगरावर एक प्राचीन गुंफा सापडली आणि त्यांच्यातला इतिहास अभ्यासक जागा झाला. या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास करण्याच्या उद्देशानं संस्थेनं मग या गुहेचे उत्खनन सुरू केलं आणि याठिकाणी अनेक लहान मोठ्या आकाराचे शिवलिंग तसेच प्राचीन तपस्व्याचें अवशेष, चिमटे, हत्यारे अशा वस्तू सापडल्या. सुमारे २०० फुट लांबीची गुंफा माती काढून मोकळी करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार ही गुंफा सुमारे १००० फुट आत असावी आणि तिचे दुसरे तोंड डोंगराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या वाघबीळ (पन्हाळा) येथे जोडले असावे असा अंदाज आहे. या गुंहेविषयि असलेल्या उत्सुकतेचं निरसन करणं हा हेतूही उत्खननापाठीमागं आहे.  या स्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी संस्था आता सरकार दरबारी पाठपुरावा करते आहे. तसे झाले तर इतिहासाचं एक पान समोर येईल.