• (0233) 2313999
  • shantiniketansangli@gmail.com
  • सांगली, महाराष्ट्र

बिसूर हायस्कूल, बिसूर

गाव तिथं शाळा द्या, मुलांना शाळेपर्यंत आणण्यापेक्षा शाळा त्यांच्यापर्यंत न्या असं प्राचार्य  डॉ.पी.बी.पाटील सांगत असत. त्यासाठीच त्यांनी शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरासोबतच आसपासच्या गावांतूनही शाळा सुरु केल्या. बिसूर हे गाव सांगलीपासून जवळपास ८-९ किलोमीटरवर असले तरी गावात शिक्षणाची सोय नव्हती. मुलांना शाळेसाठी बुधगाव, कवलापूर, माधवनगरपर्यंत चालत यावं लागायचं. गावातच हायस्कूल सुरु करावं यासाठी गावकऱ्यानी प्रयत्न केले पण त्यावेळची सरकारी धोरणं आडवी आली.  यानंतर मा. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना नवभारत शिक्षण संस्थेनं या गावात शाळा सुरु करायचे प्रयत्न केले आणि या ८ जून १९७८ रोजी इयत्ता आठवीचा वर्ग सुरु करायला शासनाची परवानगी मिळाली. आज या शेतीप्रधान गावाच्या वेशीवरच संस्थेच्या मालकीच्या ७८ गुंठे रम्य परिसरात या शाखेचं कामकाज चालतं. सध्या या ठिकाणी इ.५ ते १० पर्यंतचे अभ्यासक्रम चालू असून इ.१ ली ते ४ थीपर्यंत प्राथमिक अभ्यासक्रमासाठी शासनाची नुकतीच मान्यता प्राप्त झाली असून तो विभाग कार्यरत झाला आहे. संस्था तसेच लोकवर्गणीच्या माध्यमातून शाखेसाठी सुसज्ज इमारत व इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून प्राथमिक विभागासाठी आता दर्जेदार नवीन इमारत बांधण्यात आली आहे. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात या शाळेचे विद्यार्थी चमकत आहेत.