• (0233) 2313999
  • shantiniketansangli@gmail.com
  • सांगली, महाराष्ट्र

भारतमाता विद्यार्थी वसतिगृह, इस्लामपूर

ज्ञान ही  विकण्याची आणि विकत घेण्याची गोष्ट नसते, याचं भान ठेवणाऱ्या प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांच्यासारखी खूप थोडी माणसं महाराष्ट्रात होऊन गेली. शिक्षणासारख्या चांगल्या कामाला कधीही पैसा कमी पडत नाही याचं उदाहरण कर्मवीर भाऊरावांनी जसं दाखवून दिलं तसं ते प्राचार्य पाटील यानीही दाखवून दिलं. १९५८ साली वाळवा तालू्क्यात इस्लामपूर येथे भारतमाता विद्यार्थी बोर्डिंग (वसतिगृह) सुरू झालं. नवभारत शिक्षण मंडळाची ही पहिली शाखा प्राचार्य  पाटील यांच्या कलापथक आणि पोवाड्याच्या माध्यमातून गोळा होत राहिलेल्या पैशातून सुरु झाली. गोरगरीब मुलांसाठी हे वसतिगृह त्यांनी सुरू ठेवलं. पोरांनो, साळा सुरू करताय तर माझ्या गरीबाची एवढी चवली असुद्या असं म्हणत एका दलित म्हातारीनं दिलेला आशीर्वाद आणि त्या चवलीची ताकद किती मोठी होती ते आज नवभारत शिक्षण संस्थेच्या लाखमोलाच्या प्रगतीवरुन दिसते. आचार्य श.द.जावडेकर यांच्यासारख्या दुरोगामी विचार करणाऱ्या शिक्षणतज्ञांनी या धडपडणाऱ्या तरुणांना हेरलं आणि त्यांना दिशा दिली. त्यांनी आपल्या मालकीची शहराच्या मध्यवर्ती ठिकाणची एक एकर जागा वसतिगृहाला देणगी स्वरूपात दिली. पुढं या शाखेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी ३ वर्षे समर्थपणे सांभाळली.

या वसतिगृहास कै.प्रभाकर जावडेकर व त्यांच्या पत्नी कै.लिलाताई जावडेकर याच बरोबर कै.शिवाराजीव पवार (भाऊ) याच मोलाचं मार्गदर्शन लाभलं. या अनुदानित वसतिगृहात १०० मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेशित आहेत. वसतिगृहास सुसज्ज व सर्व सोयिनियुक्त दोन मजली इमारत उपलब्ध करून दिली आहे.