• (0233) 2313999
  • shantiniketansangli@gmail.com
  • सांगली, महाराष्ट्र

श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरूंदवाड

नवभारत शिक्षण मंडळाचं काम कोल्हापूर जिल्ह्यात सुरु करा असा आग्रह यशवंतराव चव्हाण यानी प्राचार्य  डॉ. पी.बी.पाटील याना केला होता. पण या परिसरात अगोदरच मौनी विद्यापीठ शिक्षणविषयक कार्य करत होतं. सांगलीत काम सुरु करु असं प्राचार्य  पाटील यानी त्यांना सांगितलं आणि त्यानंतर मा. वसंतदादांच्या सहकाङ्र्मानं नवभारत शिक्षण मंडळाचं काम शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या रुपानं सांगलीत सुरु झालं..पण तरीही प्राचार्य  डॉ. पाटील याची कोल्हापूर जिल्ह्याकडं ओढ राहिली होतीच. त्यातून आणि लोकांच्या मागणीतून मग १९७२ मध्ये  कुरूंदवाडमध्ये  सुरु झालं श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय. संस्थेचे माजी विश्वस्त आणि काङ्र्माध्यक्ष, माजी आमदार, श्री दत्त सहकारी साखर कारखान्ङ्माचे चेअरमन स्व.आप्पासाहेब उङ्र्क सा.रे.पाटील साहेब यांच्या भरीव ङ्मोगदान आणि सहकाङ्र्मातून या शाखेची सुरूवात झाली आहे. तत्पुर्वी याठिकाणी श्री दत्त महाविद्यालय हे पदवी अभ्यासक्रमाचं वरिष्ठ महाविद्यालय कार्यरत होतं. राज्ङ्मातील हे एकमेव स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय असून या शाखेत इ.११ व १२ वी अभ्यासक्रम सुरु आहे.

दर्जेदार निकाल आणि क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण उज्ज्वल यश हे या शाखेचं खास वैशिष्ट. या महाविद्यालयाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी जगाच्या पाठीवर आपलं स्वतंत्र आस्तित्व सिध्द करुन दाखवलं आहे. या शाखेसाठी शासनाकडून २ हे्नटर ८४ आर इतकी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून या भव्य शैक्षणिक संकुलाचे नुकतेच मा.आमदार डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील शैक्षणिक संकुल असे नामाधिकरण करण्यात आले आहे.